धर्मेंद्र यांचा मोठा परिवार
2 विवाह, 6 अपत्य अन् 13 नातवंडं
धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. पूर्ण चित्रपटसृष्टी शोकमग्न आहे, परंतु अभिनेत्याच्या निधनामुळे सर्वाधिक दु:ख त्याच्या परिवाराला झाले आहे. धर्मेंद्र हे परफेक्ट फॅमिली मॅन होते. हेमा मालिनी आणि त्यांची प्रेमकहाणी 90 च्या दशकातील बॉलिवूडमधील गाजलेल्या प्रेमकहाण्यांपैकी एक होती. हेमामालिनींसोबत विवाह करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचा विवाह झाला होता आणि त्यांना 4 अपत्यंही होती.
धर्मेंद्र यांना एकूण 6 अपत्यं आहेत. धर्मेंद्र यांचा वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत विवाह झाला होता. या जोडप्याला दोन मुली अणि दोन मुलगे आहेत. तर हेमा यांच्यासोबत झालेल्या विवाहानंतर आणखी दोन मुली झाल्या. एकंदरीत धर्मेंद्र यांचे दोन विवाह झाले होते आणि त्यांना 2 पुत्र आणि चार कन्या आहेत.
धर्मेंद्र यांच्या सर्व अपत्यांचे विवाह झाले असून एकूण 13 नातवंडं आहेत. ज्येष्ठ पुत्र सनी देओलला दोन मुलगे आहेत. तर बॉबी देओलला देखील दोन मुलं आहेत. कन्या विजेता हिला मुलगी आणि मुलगा आहे. दुसरी कन्या अजिताला दोन मुली आहेत. ईशाला दोन मुली आहेत. तर कनिष्ठ कन्या अहानाला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. सनी देओलने पूजासोबत 1984 साली विवाह केला होता. बॉबीची पत्नी तान्या ही एक उद्योजिका असून त्यांनी 1996 साली विवाह केला होता.
धर्मेंद्र यांच्या चार कन्या काय करतात?
अजिता देओल ही पेशाने शिक्षिका असून ती अमेरिकेत काम करते. अजिताचे पती किरण चौधरी हे डेंटिस्ट आहेत. धर्मेंद्र यांची दुसरी कन्या विजेताने विवेक गिलसोबत लग्न केले असून त्यांना साहिल आणि प्रेरणा अशी दोन अपत्यं आहेत. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांना ईशा आणि अहाना या दोन कन्या आहेत. यातील ईशाचे भरत तख्तानीसोबत लग्न झाले होते, परंतु ईशाने घटस्फोट घेतला आहे. तर धर्मेंद्र यांची कनिष्ठ कन्या अहानाने वैभव वोहरासोबत लग्न पेले आहे.