For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Dharashiv News | अहमदाबादमध्ये धाराशिवचा डंका! जागतिक योगासन स्पर्धेत 'सुवर्णकन्या' हिंदवी चौरेची ऐतिहासिक कामगिरी

04:59 PM Jun 10, 2026 IST | NEETA POTDAR
dharashiv news   अहमदाबादमध्ये धाराशिवचा डंका  जागतिक योगासन स्पर्धेत  सुवर्णकन्या  हिंदवी चौरेची ऐतिहासिक कामगिरी
Advertisement

धाराशिव-अहमदाबाद येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिवच्या हिंदवी चौरे हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावत विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे. यापूर्वी जिल्ह्यातील योगपटू साबळे यांच्या जागतिक यशानंतर आता हिंदवीच्या सुवर्ण कामगिरीमुळे धाराशिवचा गौरव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावला आहे.

Advertisement

योगासन भारतच्या अधिपत्याखाली, गुजरात राज्य योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने तसेच केंद्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत जगभरातील अव्वल योगपटूंनी सहभाग नोंदविला . भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धाराशिवच्या खेळाडूंनी या स्पर्धेत उल्लेखनीय ठसा उमटविला.

‘धाराशिवची सुवर्णकन्या’ म्हणून ओळख असलेल्या हिंदवी चौरे हिने सब-ज्युनिअर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर पडली असून ती जागतिक योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी जिल्ह्यातील दुसरी योगपटू ठरली आहे.हिंदवीच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.