For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात

09:55 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात
Advertisement

बेळगाव : धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीच्यावतीने मंगळवारी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपतींच्या स्मारकास दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना अनिल बेनके म्हणाले, स्वराज्य आणि धर्मनिष्ठा जोपासून शूरवीर संभाजीराजांनी मुघल साम्राज्याला कडवी झुंज दिली. पराजित न होता 120 युद्धे जिंकून मराठीशाहीचे अस्तित्व अबाधित ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडविण्यात संभाजीराजांचा मोलाचा वाटा होता, असे त्यांनी सांगितले. धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले. संभाजी महाराजांच्या स्मारकाला सुशोभीकरण करण्यात आले होते. यावेळी श्रीनाथ पवार, प्रमोद कंग्राळकर, निशांत कुडे, श्रवण जुटे, मंथन कामुले, सुमित पाटील, प्रसाद पवार यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.