महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भरपावसातही दौडले धारकरी..!

11:05 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चिंब भिजूनही निष्ठा कायम : भरपावसात जल्लोषी स्वागत

Advertisement

बेळगाव : परतीच्या भरपावसातही गुरुवारी दुर्गामाता दौड शहरात उत्साहात पार पडली. पहाटेपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला होता. मात्र, यामध्ये चिंब भिजून शिवरायांच्या प्रति असलेली निष्ठा दौडमधील धारकऱ्यांनी दाखवून दिली. शहर परिसरातील मुख्य बाजारपेठेसह विविध गल्ल्यांमध्ये दौड मार्गस्थ झाली. परतीच्या जोरदार पावसाने दौडमध्ये व्यत्यय येईल असे वाटत होते. मात्र, कोसळणाऱ्या पावसातही धारकऱ्यांनी भिजून शिवरायांविषयी असलेली निष्ठा दाखवून दिली. शिवाय आठव्या दिवशीची दौडही यशस्वी केली.

Advertisement

भरपावसात देखावे-आरतीची परंपरा

गुरुवारी पहाटेपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसातही दौड मार्गावर देखावे सादर करण्यात आले. त्याबरोबरच परंपरा कायम राखत महिलांनी औक्षण करून ध्वजपूजन केले. पाऊस कितीही मोठा असला तरी दौड मार्गावरील देखावे आणि आरतीची परंपरा मात्र कायम टिकून राहिली. माँसाहेब जिजाऊ, शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत बालकांनी देखावे सादर केले.

पावसातही शिवरायांचा जयघोष

गुरुवारी सकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसातही शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबांचं होणार, आदींचा जयघोष सुरू होता. त्याबरोबरच स्फूर्तिगीते आणि पुष्पवृष्टीही करण्यात आली. पावसातील जयघोषांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. धर्मवीर संभाजी चौक येथून आठव्या दिवशीच्या दौडला प्रारंभ झाला. या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. ध्वज चढवून प्रेरणामंत्राने दौडला चालना देण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथून दौडला प्रारंभ होऊन किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, अशोक चौक, बसवाण गल्ली, लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, बुरुड गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, तेंगीनकेरा गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, तेंगीनकेरा गल्ली, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर, सरदार्स ग्राऊंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक येथील मारुती मंदिरमध्ये सांगता करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र चौक येथे प्रसाद मेडिकल्सचे सी. के. पाटील, सीपीआय दिलीप निंबाळकर व माजी महापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. यावेळी येथील मारुती मंदिरात मारुतीची आरती करून आठव्या दिवशीच्या दौडची सांगता करण्यात आली.

उद्याचा दौडचा मार्ग...

मारुती गल्ली येथील मारुती मंदिरपासून दौडला प्रारंभ होणार आहे. नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनसूरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खूट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, कंग्राळ गल्ली, सरदार्स ग्राऊंड रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, काळी आमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड येथून धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता होणार आहे.

पावसातील दौड अविस्मरणीय

गुरुवारी पहाटे शहरात कोसळलेल्या पावसामुळे दौडमध्ये व्यत्यय येईल, असे वाटत होते. मात्र, भरपावसातही धारकऱ्यांनी निष्ठा कायम ठेवत सहभाग दर्शविला. शिवाय धारकऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे गुरुवारची पावसातील दौड अविस्मरणीय ठरली.

उद्या हभप शिरीष मोरे महाराज देहूकर यांची उपस्थिती

शनिवार दि. 12 रोजी दुर्गामाता दौडची सांगता होणार आहे. या सांगता कार्यक्रमासाठी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हभप शिरीष मोरे महाराज देहुकर उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत शेकडो प्रवचने आणि हजारो कीर्तनांच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे काम केले आहे. शिवछत्रपती, शंभू छत्रपती, मराठा इतिहास व संत साहित्यावर प्रासंगिक लिखाण केले आहे. शनिवारच्या धर्मवीर संभाजी चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत. धारकरी, शिवभक्त आणि वारकरऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article