For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धनुषचा ‘कारा’ 30 एप्रिलला

06:31 AM Apr 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
धनुषचा ‘कारा’ 30 एप्रिलला
Advertisement

बॉलिवूड चित्रपट ‘तेरे इश्क में“द्वारे प्रशंसा मिळविणारा धनुष आता नव्या चित्रपटावरून चर्चेत आहे. निर्मात्यांनी धनुषचा आगामी चित्रपट ‘कारा“च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विग्नेश राजा यांनी केले आहे. अॅक्शन एंटरटेनर चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती इशारी के. गणेश यांनी जाहीर केली आहे. त्यांचे प्रॉडक्शन हाउस वेल्स फिल्म इंटरनॅशनलच्या बॅनर अंतर्गत ‘कारा“ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Advertisement

कुठल्याही गोष्टीला जर स्वत:चा ड्रीम प्रोजेक्ट म्हणायचे असल्यास मी निश्चितपणे अभिनेता धनुषसोबतचा ‘वदा चेन्नई 2“ सांगेन. तसेच धनुषचा आगामी चित्रपट ‘कारा“ 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याचे निर्माते इशारी के. गणेश यांनी सांगितले आहे. गणेश हे वेल्स युनिव्हर्सिटीचे संस्थापक अन् कुलगुरु आहेत.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोंगल वेळी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केला होता, यात धनुष हा इंटेंस लुकमध्ये दिसून आला. ‘कधीकधी धोकादायक म्हणून राहणेच जिवंत राहण्याचा एकमात्र मार्ग असतो“ असे या पोस्टरमध्ये लिहिले गेले होते. कारा चित्रपटात ममिता बैजू नायिका म्हणून झळकणार आहे. याचबरोबर एस. रविकुमार, जयराम सूरज वेंजारामूडु, करुणास आणि पृथ्वी पंडिराज देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.