हॉलिवूडमध्ये पुन्हा झळकणार धनुष
सिडनी स्वीनीसोबत करणार अभिनय
अभिनेता धनुष सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. यात तेलगू चित्रपट कुबेरा, तमिळ चित्रपट नीलावु एनमेल एन्नाडी कोबाम आणि इडली कडाई, हिंदी चित्रपट तेरे इश्क में आणि तमिळ चित्रपट इलैयाराजा यांचा बायोपिक सामील आहे. तर अभिनेता आता हॉलिवूडमध्ये पुन्हा अभिनय करताना दिसुन येणार आहे.
अभिनेता सिडनी स्वीनीसोबत तो एका चित्रपटात दिसून येणार आहे. सिडनी स्वीनी हा वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड आणि मॅडम वेब यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. नव्या चित्रपटाचे नाव स्ट्रीट फायटर असून सोनी प्रॉडक्शन्सकडून याची निर्मिती केली जाणार आहे.
हा चित्रपट एका व्हिडिओ गेमवर आधारित असल्याचे समजते. तसेच हा चित्रपट मार्च 2026 मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. धनुषने 2022 मध्ये द ग्रे मॅन या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये स्वत:च्या कारकीर्दीस सुरुवात केली होती. या चित्रपटात रयान गोसलिंग, क्रिस इवान्स, एना डी अरामास आणि अन्य कलाकार दिसून आले होते.