‘इडली कढाई’ मध्ये धनुष्य आणि नित्या
दाक्षिणात्य अभिनेता धनुष हा लवकरच ‘इडली कढाई’ या चित्रपटात दिसून येणार आहे. धनुषने यात मुख्य भूमिका साकारण्यासोबत याचे दिग्दर्शन देखील केले आहे. हा चित्रपट आकाश भास्करन यांनी निर्माण केला आहे. चित्रपटाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून केवळ 10 टक्के चित्रिकरण शिल्लक असून ते विदेशात पार पडणार असल्याचे भास्करन यांनी सांगितले. या चित्रपटात नित्या मेनन, अरुण विजय, राजकिरण, पार्थिवन यासारखे मोठे कलाकार असणार आहेत. हा चित्रपट अत्यंत चांगल्याप्रकारे निर्माण केला जाणार आहे. चित्रपटात अरुण विजय खलनायकाच्या भूमिकेत असल्याची माहिती भास्करन यांनी दिली आहे. या चित्रपटाचे नाव इडली कढाई ठेवण्याचा निर्णय धनुषनेच घेतला आहे. धनुष याचबरोबर कुबेरा आणि तेरे इश्क में या चित्रपटांमध्ये काम करणार आहे. यातील एका चित्रपटात तो रश्मिका मंदाना आणि दुसऱ्या चित्रपटात क्रीति सेनॉनसोबत दिसून येणार आहे. त्याने यापूर्वी ‘नीक’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि याला प्रेक्षकांकडून चांगलाप्रतिसाद मिळाला होता.