कोल्हापुरात धनगर समाज आक्रमक! राज्य सरकारच्या निषेधासाठी मुंडण आंदोलन
धनगर आरक्षणासाठी राज्यभरातून आंदोलने होत असताना कोल्हापूरातही धनगर समाज आक्रमक झाला आहे. आज कोल्हापूरातील सकल धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आले असून राज्यसरकारचा निषेध करण्यासाठी मुंडण आंदोलन करण्यात आले. यासाठी कार्यकर्त्यांकडून स्वत:चे मुंडण करून सरकारचा निषेध केला.
VIDEO>>> कोल्हापुरात धनगर समाज आक्रमक! राज्य सरकारच्या निषेधासाठी मुंडण आंदोलन
कोल्हापुरात सकल धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी या मागणीसाठी आज धनगर बांधवांनी मुंडण आंदोलन करण्यात आले आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत नाही. त्यामुळे आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात सकल धनगर समाजाच्या वतीने शासनाचा निषेध करत मुंडण आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन ढोल बडवत सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच धनगर आरक्षणासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.