महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'युजवेंद्र चहल'ची पत्नी धनश्रीने मागितली तब्बल ६० कोटींची पोटगी ?

03:30 PM Jan 17, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

मुंबई
क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. 'युजवेंद्र चहल' आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चर्चेचे कारण या दोघांचा घटस्फोट हे आहे. युजवेंद्र ने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून पत्नी समवेतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे या दोघांच्यातील मतभेदावर सोशल मिडीयावर चर्चा सुरु झाली. दरम्यान युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्मा हिचा एक व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला. धनश्रीने फेम मिळवण्यासाठी युजवेंद्रसोबत लग्न केल्याचाही आरोप सातत्याने तिचावर होत आहे. यानंतर धनश्रीने सोशल मिडीया अकाऊंटवरून या सगळ्या चर्चेवर संताप व्यक्त केला. पण या पोस्टमध्ये कुठेही युजवेंद्रचे नावही घेतलेले नाही किंवा घटस्फोटाची चर्चा ही अफवा असल्याचेही म्हणले नाही आहे.
दरम्यान आता धनश्रीने युजवेंद्रकडे घटस्फोटाची पोटगी ६० कोटी रुपये मागितली असल्याची चर्चा पुढे येत आहे. परंतु युजवेंद्र चहलने मात्र या मागणीला नकार दिला आहे. धनश्री आणि युजवेंद्र दोघांनी एकमेकांना सोशलमिडीया अनफॉलो केले आहे. धनश्री वर्मा हिला एक तेलगू चित्रपट मिळाला असून ती त्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. युजवेंद्र आणि धनश्री हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत नाही आहेत. त्यामुळे या दोघांच्या नात्यावर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article