For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकारणापासून दूर, फिटनेसवर फोकस; धनंजय मुंडेंचा नवा अवतार चर्चेत!

10:51 AM Sep 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजकारणापासून दूर  फिटनेसवर फोकस  धनंजय मुंडेंचा नवा अवतार चर्चेत
Advertisement

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जीममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते उत्साहाने व्यायाम करताना दिसत असून, त्यांचा नवा फिटनेस लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Advertisement

राजकीय घडामोडींपासून काहीसे अलिप्त असताना धनंजय मुंडे सध्या आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत असल्याचे या व्हिडीओतून दिसून येत आहे. नियमित व्यायाम आणि फिटनेसवर भर देत ते जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत.

धनंजय मुंडे यांचा फिटनेसकडे असलेला कल यापूर्वीही पाहायला मिळाला आहे. मात्र, यावेळी त्यांच्या लूकमध्ये झालेला बदल विशेष लक्षवेधी ठरत आहे. व्यायामामुळे त्यांच्यात झालेले फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन सोशल मीडियावर चर्चिले जात आहे.

Advertisement

गेल्या काही काळात विविध राजकीय कारणांमुळे धनंजय मुंडे सक्रिय राजकारणात तुलनेने कमी दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा हा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या व्हिडीओमधून धनंजय मुंडे यांनी आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्टपणे दिसत असले, तरी त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडेही समर्थकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.