महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धामणी धरणाची घळभरणी करा...अन्यथा आमरण उपोषण; धामणी धरण कृती समितीचा इशारा

03:15 PM Mar 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
Dhamani Dam Action Committee
Advertisement

म्हासुर्ली / वार्ताहर

धामणी खोरा कृती समिती व लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत राई (ता.राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्प स्थळावर धडक देत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर धरणाच्या घळभरणीबाबत चर्चा केली.यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी येत्या ऑक्टोंबर पासून घळभरणी करण्यासाठी नियोजन असल्याचे सांगितले.मात्र उपस्थित शेतकऱ्यांनी एक आक्टोंबरला काम सुरू न झाल्यास दोन ऑक्टोंबर पासून रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून आमरण उपोषण करण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिला दिला.

Advertisement

गेल्या 23 वर्षापासून धामणी प्रकल्पाचे काम रखडल्याने धामणी खोऱ्याचा विकास रखडला असून जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन वर्षापासून धामणी प्रकल्पाचे काम कासव वतीने चालू असून प्रशासन वेळ काढून पणा करत आहे.
पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आले आल्याने महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग व लोकप्रतिनिधींनी डिसेंबर 2023 मध्ये प्रकल्पाच्या उर्वरित घळभरणीचे काम हाती घेऊन एक टीएमसी पाणी साठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्याने धरणाच्या घळभरणीचे काम सुरू न झाल्याने धामणी खोऱ्यातील जनतेतून संभ्रम व्यक्त होत होता.

Advertisement

मात्र गेल्या एक आठवड्यापासून धरणाच्या सद्य परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे कृती समिती व शेतकऱ्यांनी संपर्क साधून बैठकीचे नियोजन केले होते.त्यानुसार मंगळवार सकाळी धरण स्थळावर बैठक घेण्यात आली.यावेळी कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देत आक्टोंबर पासून घळभरणी बाबतचे नियोजन असल्याचे सांगितले. मात्र उपस्थित शेतकऱ्यांनी घरभरणीचे काम एक ऑक्टोबरला सुरू न झाल्यास गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोंबर पासून धरण स्थळावर आमरण उपोषण करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला.यावेळी झालेल्या चर्चेत मनोज देसाई,ज्ञानदेव पाटील, राजाराम पात्रे,राम चौगुले यांनी सहभाग घेत धामणी वासियांचे प्रश्न मांडले.

यावेळी सहाय्यक अभियंता एस.एन.पाटील, दिनकर पाटील, विलास बोगरे, रवींद्र पाटील,लहू सरनोबत,संभाजी पाटील,पांडुरंग पाटील,शाहू काटे,विजय पाटील,आनंदा भित्तम, अमोल पालव यांच्यासह कृती समितीचे सदस्य व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
Dhamani Dam Action CommitteeFarmers Warning Irrigationtarun bharat news
Next Article