संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहणऱ्या धैर्यशील मानेंना निवडून द्या- सदाभाऊ खोत
बहे / प्रतिनिधी
पूर परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या जनतेला अडचणीतून बाहेर काढण्यांसाठी बहेसह वाळवा तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात शासकीय निधीच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे .रामलिंग बेटाच्या विकासासाठी महायुतीच्या सरकारने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. देशाला एकसंघ ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाच्या घरोघरी पोहचले आहेत. त्यामुळे महापूर व कोरोनाच्या काळात अधिवेशन अर्धवट सोडून मतदारसंघातील जनतेच्या संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहणाऱ्या महायुतीचे उमेदवार खास. धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवू असा विश्वास माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ बहे (ता. वाळवा) येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते .
माजी मंत्री खोत यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी साखर कारखान्यांचा चौदा हजार कोटी इन्कम टॅक्स माफ केला आहे . तसेच उसाची एफआरपी तीनशे रुपये वाढविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
खास. धैर्यशील म्हणाले, मोदी सरकारने देशातील ऐशी कोटी जनतेला कोरोना काळापासुन आज अखेर मोफत अन्न धान्य वाटप सुरु ठेवले आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये प्रत्येक गावात मी कमी अधिक प्रमाणात विकास निधी दिला आहे. पण दिलेला निधी जनतेला सांगण्यात कमी पडलो आहे . मी काम करणारा खासदार आहे . तरी धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत उपस्थित नेत्यांनी भरघोस मतदान देण्याची ग्वाही दिली .यावेळी राहुल महाडिक, सागर खोत, भाजपा तालुका अध्यक्ष निवास पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, आनंदराव पवार , विक्रम पाटील भाजपाचे संदीप सावंत, राहुल महाडिक, सागर मलगुंडे, खुषाजीराव थोरात, विनायक जाधव, यदुराज थोरात, वीरेंद्र राजमाने, जयवंत थोरात, विजयमाला पाटील, पुष्पलता थोरात , शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख वर्षा निकम, वाळवा तालुकाप्रमुख प्रणाली लोंढे, इस्लामपूर महिला शहरप्रमुख प्रमिला पाटील, पूनम लोंढे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान माजी मंत्री सदाभाऊ खोत व खास. धैर्यशील माने यांनी साखराळे, हुबालवाडी, खरातवाडी, कार्णेवाडी , बहे, बनेवाडी, ताकारी, दुधारी , रेठरे हरणाक्ष , भवानीनगर, बिचुदसह अन्य गावाचा संपर्क दौरा केला .