For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रात्रीचा दिवस करून धैर्यशील माने यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू- प्रकाश आवाडे

07:28 PM Apr 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
रात्रीचा दिवस करून धैर्यशील माने यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू  प्रकाश आवाडे
Dhairyashil Mane
Advertisement

हुपरी :

खासदारकीच्या काळांतील तीन वर्षे कोरोना आणि महापुरामुळे वाया गेली असतानाही उर्वरीत केवळ दोन वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खा.धैर्यशील माने यांनी मतदारसंघातील चकाचक रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहती साठी तब्बल आठ हजार दोनशे कोटींचा निधी केंद्र आणि राज्य शासनासी समन्वय साधत खेचून आणला आहे. अजूनही निधी आणून मतदारसघाचा रचनात्मक विकास साधण्याचे व्हिजन डोळ्यासमोर असण्राया नेत्यांकडेच या मतदारसंघाचे नेतृत्व असणे गरजेचे आहे. गोरगरीब जनतेसाठी तळमळीने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. त्यांना तिस्रयांदा पंतप्रधान करणे हे आमचे देखील स्वप्न आहे. त्यासाठीच आपण महायुतीचा आघाडीधर्म पाळत धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार केला असून त्यांना ताराराणी पक्षातर्फे रात्रीचा दिवस करून उच्चांकी मतांनी निवडून आणू असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी आज व्यक्त केला.

Advertisement

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित ताराराणी पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ताराराणीचे शहर अध्यक्ष ज्येष्ठ नेते आण्णासाहेब शेंडूरे होते. धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे, उद्योगपती महावीर गाट, गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, जवाहर चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, संचालक सूरज बेडगे, अमेय जाधव, किरण कांबळे, रिपाई (आठवले) राज्य सचिव मंगलराव माळगे, कवाडे गटाचे विद्याधर कांबळे, मोहन वाईंगडे, विलासराव खानविलकर (रेंदाळ), सरपंच दादासाहेब मोरे ( इंगळी), राजु मगदूम ( माणगाव), शिवाजी पाटील ( साजणी), संगिता नरदे (रांगोळी), प्रकाश जाधव, बाळासाहेब रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार आवाडे म्हणाले, नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठीच आपण लोकसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आपण थांबलो. फिर एक बार मोदी सरकार येण्यासाठी धैर्यशील माने यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

धैर्यशील माने म्हणाले, पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी देशातील 130 कोटी पैकी 80 कोटी गरीब जनतेला मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक गावागावात भरघोस निधी आणू शकलो. गेल्या दोन वर्षात 800 कोटीवर निधी एका हातकणंगले तालुक्यात आणला असून आपल्यावर टीका करण्रायांनी हे ध्यानात घ्यावे. देशाचे नेतृत्व घडविणारी ही निवडणूक असून मी निमित्तमात्र आहे. निवडणूकीत
आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठिंब्या मुळे दहा हत्तींचे बळ मिळालेले आहे. भविष्यकाळात राहुल आवाडे यांच्यासाठी आपण दोन पाऊल पुढे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी राहुल आवाडे, महावीर गाट, मुरलीधर जाधव, मंगलराव माळगे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अजित सुतार, भाजपचे शहर अध्यक्ष सुभाष कागले, अनिल कांबळे (पट्टण कोडोली ) आदींची भाषणे झाली. मेळाव्यास आवाडे समर्थक कार्यकर्त्यांसह भाजप व शिवसेना (शिंदे) कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.