महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनपाकडून पुन्हा प्लास्टिक विरोधात धडक मोहीम

06:24 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस रोड, तिसरे रेल्वेगेट परिसरातील दुकानांची तपासणी, सात हजार रुपये दंड वसूल

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

महानगरपालिकेच्यावतीने प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी काँग्रेस रोड, तिसरे रेल्वेगेट परिसरातील दुकानांवर धाड टाकून प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिक विरोधी कारवाईमुळे पुन्हा एकदा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. प्रथम प्लास्टिकला पर्याय निवडावा त्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकवर निर्बंध घालणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून याबाबत आदेश आला आहे. त्यानुसार महानगरपालिकेचे कर्मचारी प्लास्टिक वापरा विरोधात कारवाईचा बडगा उचलत आहेत. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

शनिवारी स्वीट मार्ट, किराणा दुकान, हॉटेल्सवर धाडी टाकण्यात आल्या. त्याठिकाणी असलेले जप्त करण्यात आले. याचबरोबर दंडही आकारण्यात आला आहे. सात हजार रुपये दंड जमा करण्यात आला आहे. यामुळे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पर्यावरण विभागाचे अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनीही या कारवाईत भाग घेतला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article