For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिजीपी सिंग यांची बदली, अलोक कुमार नवे डिजीपी

11:33 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
डिजीपी सिंग यांची बदली  अलोक कुमार नवे डिजीपी
Advertisement

आसगाव येथील घर मोडणे प्रकरणात सिंग ठरले होते वादग्रस्त

Advertisement

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर मोडणे प्रकरणात वादग्रस्त ठरलेले पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची गोव्यातून दिल्लीत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे जसपाल सिंग यांना अखेर गोव्यतून गाशा गुडाळावा लागला. त्यांच्या जागी अलोक कुमार (आयपीएस अधिकारी 1996 तुकडी) गोवा पोलीस महासंचालक म्हणून ताबा घेतील. तसा आदेश काल शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयाचे संचालक बी. जी. कृष्णन यांनी जारी केला आहे.

आगारवाडेकर कुटुंबियांचे घर पाडले तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले होते. आगरवाडेकर कुटुंबियांचे घर मुंबई येथील पूजा शर्मा हिच्या सांगण्यावऊन पाडले होते. घर पाडतानाची प्रक्रिया सुऊ असताना हणजूण पोलिस तेथे उपस्थित होते. आगरवाडेकर कुटुंबियांनी त्याला विरोध कऊनही घर पाडण्यात आले. या घटनेवऊन पोलिसांवरही आरोप झाला होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक, उपनिरीक्षक व एका कॉन्स्टेबलला निलंबित करून या प्रकरणाचा तपास सुऊ करण्यात आला होता.

Advertisement

दरम्यान निलंबित करण्यात आलेल्या हणजूण पोलिसांनी आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्यासाठी पोलिस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग यांनी आपल्यावर दबाव टाकला, अशी जबानी हणजूण पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशाल नाईक देसाई यांनी चौकशी अहवालात नोंद केली होती. सदर अहवाल हा हणजूण पोलिसांनी मुख्य सचिवांना तसेच उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. त्यांच्या या जबानीमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी सरकारासह डीजीपी जसपाल सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडताना डीजीपी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत केंद्रीय गृहमत्रालयात कळविले आणि डीजीपी जसपाल सिंग यांची गोव्यातून बदली करण्याची मागणी केली होती.

Advertisement
Tags :

.