For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकण रेल्वे विरुद्धच्या साखळी आंदोलनाला देव्या सूर्याजींचा पाठिंबा

05:27 PM Nov 21, 2023 IST | अनुजा कुडतरकर
कोकण रेल्वे विरुद्धच्या साखळी आंदोलनाला देव्या सूर्याजींचा पाठिंबा
Advertisement
कोकण रेल्वेकडून सावंतवाडीकरांवर होणा-या अन्यायाविरुध्द तसेच बंद केलेल्या रेल्वे गाडयांना सावंतवाडीत थांबा देण्यासह सावंतवाडी रेल्वे टर्मिनस कार्यान्वित करण्यासाठी येत्या २६ जानेवारीला सावंतवाडी करांच्या मागण्यांसाठी कोकण रेल्वे विरुध्द साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा मिहीर मठकर यांनी दिला आहे. या आंदोलनाला युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर गाडयांना थांबा नसल्याने सावंतवाडीकर जनतेला कुडाळवारी करावी लागत आहे. एक्प्रेसने मुंबईला ये-जा करायची असेल तर कुडाळला जावं लागत आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या बंद केलेल्या रेल्वे गाडयांना पुन्हा थांबा देण्यात यावा अशी मागणी आहे. वारंवार लक्ष वेधून कोकण रेल्वे दुर्लक्ष करत असल्यामुळे मिहीर मठकर यांनी सावंतवाडीकरांच्यावतीन साखळी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याला आमच्या संघटनेसह  युवकांचा देखील पाठिंबा आहे. मोठया संख्येने युवा वर्ग या साखळी आंदोलनात सहभागी या आंदोलनाला युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर गाडयांना थांबा नसल्यान सावंतवाडीकर जनतेला कुडाळवारी करावी लागत आहे. एक्सप्रेसने मुंबईला ये-जा करायची असेल तर कुडाळला जाव लागत आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या बंद केलेल्या रेल्वे गाडयांना पुन्हा थांबा देण्यात यावा अशी मागणी आहे. वारंवार लक्ष वेधून कोकण रेल्वे दुर्लक्ष करत असल्यामुळे मिहीर मठकर यांनी सावंतवाडीकरांच्यावतीने साखळी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याला आमच्या संघटनेसह युवकांचा देखील पाठिंबा आहे. मोठया संख्येने युवा वर्ग या साखळी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देव्या सूर्याजी यांनी दिली.
Advertisement
Advertisement
Tags :

.