महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

04:31 PM Nov 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

देव्या सुर्याजींची वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी

Advertisement

युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी त्यांच्याकडे केली. रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व रूग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी देव्या सुर्याजी यांनी केली आहे. यावर डॉ. ऐवळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. गिरीश चौगुले, डॉ. आकाश हेडगे, मिहीर मठकर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news# sawantwadi # devya suryaji #
Next Article