For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवरुखात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या सकाळी ६ वाजल्यापासून रांगा! खतांच्या अपुऱ्या पुरवठ्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

02:33 PM Jun 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
देवरुखात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या सकाळी ६ वाजल्यापासून रांगा  खतांच्या अपुऱ्या पुरवठ्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
Advertisement

देवरुख प्रतिनिधी

देवरुखात खत खरेदीसाठी शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
पावसाचा सामना करत हे शेतकरी रांगेत उभे असल्याचे चित्र होते. १०० मीटर अंतरापर्यंत शेतकऱ्यांची रांग लागली होती. तालुक्यातील पूर, पाटगाव, ओझरे, सायले, सोनवडे, बोरसुत, विग्रवली आदी गावातील २००हुन अधिक शेतकरी रांगेत तिष्ठत उभे होते. अखेर ११ वाजता खत साठा संपल्याने अनेक शेतकऱ्यान खताविना खाली हात परतावे लागले. खत विक्रेत्यांनी चार दिवसानंतर खत येईल असे शेकऱ्याना सांगितले.

Advertisement

कृषी विभागाच्या अनागोंदी कारभराबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खत उपलब्ध होईपर्यंत शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबवायची का असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.