For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | वाई नगरीत लघुकुंभमेळ्याचा भक्तीमय शुभारंभ; महाआरतीला भाविकांची तोबा गर्दी!

06:12 PM May 23, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   वाई नगरीत लघुकुंभमेळ्याचा भक्तीमय शुभारंभ  महाआरतीला भाविकांची तोबा गर्दी
Advertisement

                                 वाईतील लघुकुंभमेळ्याने कृष्णाकाठ भक्तिमय

Advertisement

वाई : पवित्र अशा वाईच्या भूमीत आयोजित करण्यात आलेल्या लघुकुंभमेळ्यामुळे वाई नगरी अधिक पावन झाली आहे. सायंकाळी महागणपती घाटावर कृष्णा नदीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे असंख्य साधुसंतांसह वाईकर नागरिकांची एकच गर्दी घाटावर झाली होती.

दक्षिण काशी अशी अध्यात्मिक ओळख असलेल्या आणि कृष्णा नदीच्या विस्तीर्ण तीरावर बसलेल्या ऐतिहासिक बाई नगरीत लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात ग्रामविकास मंत्री जयकुमार यांच्याहस्ते व साधू-संताच्या उपस्थितीत झाला आहे. या नगराध्यक्ष अनिल सावंत व आयोजकांच्या हस्ते कृष्णेची आराधना करण्यात आली यावेळी बाईकर नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.

Advertisement

या प्रसंगी विशेष उपस्थिती लाभलेले गुजरात अटल धामचे परमपूज्य महंत महादेवगिरीजी
महाराज म्हणाले, अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते व हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळते. या पवित्र कुंभमेळ्याच्या ऊर्जेमुळे बाई तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.

या सोहळ्याला गुजरातहून आलेले योगेंद्रगिरी महाराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, विरोधी पक्ष नेते विजय ढेकाणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन घाटगे, मंदीर महासंघ तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, कृष्णा नदी सेवा समितीचे सदस्य काशिनाथ शेलार, अॅड. दीप्ती पिसाळ, जितेंद्र पिसाळ, सचिन सावंत, निलेश जनसागर कृष्णाकाठावर लोटला होता. महाआरती संपन्न झाल्यानंतर, कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या उपस्थित महंत, साधू संत आणि नागा सन्यासी यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. अनेकांनी मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन, लघुकुंभमेळा सेवा समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत चोख नियोजन व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता हा सोहळा अत्यंत शिस्तीत आणि उत्साहात पार पडला.

Advertisement
Tags :

.