महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा भागातील गणेश मूर्तींचे भक्तीभावाने विसर्जन

10:29 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/हिंडलगा 

Advertisement

हिंडलगा येथील मरगाई गल्ली, लक्ष्मी गल्ली, रामदेव गल्ली, महादेव गल्ली, सोमनाथनगर, मांजरेकरनगर, कलमेश्वरनगर येथील सार्वजनिक गणपती मूर्तींचे विसर्जन बेळगाव येथील जक्कीनहोंडा, कपिलेश्वर तलाव, मार्कंडेय नदी व येथील काही तलावात विसर्जन करण्यात आले. या भागातील हिंडलगा, विजयनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर, श्रीनाथनगर, सोमनाथनगर, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, आंबेवाडी, मण्णूर येथील घरगुती गणपती वेगवेगळ्या वाहनांची सजावट करून मार्कंडेय नदीकाठावर पूजाअर्चा करून विसर्जन करण्यात आले. काही सार्वजनिक गणपतीसमोर डॉल्बी लाऊन युवावर्ग गुलालाची उधळण करत नृत्य करत होते.

Advertisement

हिंडलगा-आंबेवाडी मार्गावरील मार्कंडेय नदीच्या जुन्या व नव्या पुलावरून मूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात झाले. यावेळी एकमेव रस्ता असल्यामुळे वाहनांच्या गर्दीमुळे बराच अडथळा होत होता. चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात एकत्र झाल्यामुळे नागरिकांना मार्ग काढणे कठीण झाले होते. यावेळी याची दखल सामाजिक कार्यकर्ते अनिल हेगडे तसेच इतर काही तऊणांनी गर्दीवर नियंत्रण केल्यामुळे वाहनधारकांचा मार्ग मोकळा करून दिला. याकामी पोलिसांचे सहकार्यही लाभले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article