For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनकनहळ्ळी महालक्ष्मीदेवीला ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी

10:03 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेनकनहळ्ळी महालक्ष्मीदेवीला ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी
Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

Advertisement

बेनकनहळ्ळी, गणेशपूर व ज्योतीनगर येथील महालक्ष्मी यात्रेला मंगळवारी प्रारंभ झाला असून बुधवार दि. 24 रोजी सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मीदेवी गदगेच्या ठिकाणी विराजमान झाली. यानंतर सर्व भाविकांनी लक्ष्मी देवीचा जयजयकार कऊन आरती म्हटली. येथील पूजेनंतर ग्रामस्थ आपल्या घरोघरी गेले. प्रत्येकांच्या घरोघरी गोड नैवेद्य व पोळ्यांचे भोजन होते. गुऊवार दि. 25 रोजी पहाटेपासूनच ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. वैशिष्ट्या म्हणजे बाहेरील गावाहून बऱ्याचशा भाविकांनी ओटी भरण्यासाठी हजेरी लावली होती. येथील प्रत्येकांच्या घरोघरी पाहुण्यांचे आगमन झाले होते त्यामुळे त्यांचा पाहुणचार करण्यात, अल्पोपहार देण्यात घरचे लोक मग्न झाले होते. बेनकनहळ्ळी गावाच्या आजूबाजूच्या गावातून महिला भाविकांनी ओटी भरण्यासाठी गर्दी केली. ओटी भरण्यासाठी येणाऱ्या भाविकांना चांगली सोय करून देण्यात आली होती. पुऊष व महिला विभागासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. यावर सिक्युरिटीमार्फत शिस्त लावल्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यास कोणती अडचण भासली नाही. दुपारच्या सत्रात ही संख्या वाढत गेली तरी देखील यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने भाविकांना अडचण होणार नाही याची दखल घेतल्यामुळे सर्वांना ओटी भरण्यासाठी अनुकूल झाले. यात्रा कमिटीमार्फत नारळ, पान विडा, हार, खेळणी ओटी भरण्याच्या साहित्याच्या दुकानदारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोनाप्पा पाटील, उपाध्यक्ष आनंद पाटील, सभासद जोतिबा देसूरकर, लक्ष्मण खांडेकर, बाळू देसूरकर व अन्य कमिटीतील सभासदांनी सर्वांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.