For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकातील भाविकाकडून अयोध्येत 30 कोटींची राममूर्ती दान

06:43 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकातील भाविकाकडून अयोध्येत 30 कोटींची राममूर्ती दान
Advertisement

हिऱ्यांनी जडवलेल्या मूर्तीचे वजन सुमारे पाच क्विंटल : लवकरच संपूर्ण तपशील होणार जाहीर

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कर्नाटकातील एका भाविकाने अयोध्येला 30 कोटी ऊपयांची हिऱ्यांनी जडवलेली भगवान रामाची मूर्ती दान केली आहे. रामलल्ला मंदिराच्या आवारात एक भव्य सोनेरी रंगाची मूर्ती स्थापित करण्यास अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांनी सजवलेली 10 फूट उंच, 8 फूट ऊंद मूर्ती कर्नाटकातील एका अनामिक भक्ताने दान केली असून मंगळवारी संध्याकाळी मूर्ती अयोध्येत पोहोचली आहे. पारंपारिक दक्षिण भारतीय शिल्पकला तंत्रांचा वापर करून बनवलेली ही मूर्ती 25 ते 30 कोटी ऊपयांची असल्याचा अंदाज आहे.

Advertisement

याबाबत माहिती देताना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले, देणगीदाराची ओळख अद्याप समजलेली नाही. मूर्तीचे वजन मोजले जात आहे. परंतु प्राथमिक अंदाजानुसार सदर मूर्तीचे वजन सुमारे पाच क्विंटल आहे. लवकरच संपूर्ण तपशील जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संत तुलसीदास मंदिराजवळील अंगद टीला येथे ही मूर्ती स्थापित होण्याची शक्मयता आहे. प्रथम तिचे अनावरण केले जाईल. त्यानंतर देशभरातील संत आणि महंत उपस्थित राहून भव्य महास्तकाभिषेक समारंभ होईल. तंजावरमधील कुशल कारागिरांनी मूर्ती निर्मितीत मोठी भूमिका बजावल्यामुळे त्याला कलात्मक आणि भव्य स्वरुप मिळाले आहे. हिरे, नीलमणी आणि सोन्याने मढवलेले, नेमके वापरलेले धातू तज्ञांनी ओळखले आहे.

Advertisement
Tags :

.