For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सिल्व्हन काजू विक्री आणि इकोटुरिझमच्या विस्तारावर भर : आमदार डॉ. देविया राणे

10:03 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिल्व्हन काजू विक्री आणि इकोटुरिझमच्या विस्तारावर भर   आमदार डॉ  देविया राणे
Advertisement
पणजी : गोवा वन विकास महामंडळाच्या (GFDC) 123 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत महामंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन त्यांच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. सिल्व्हन काजू उत्पादनांची विक्री वाढविणे आणि इकोटुरिझम उपक्रमांना अधिक चालना देण्यावर भर देण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. देविया राणे यांनी दिली.

कळंगुट येथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या सिल्व्हन विक्री केंद्राच्या माध्यमातून सिल्व्हन काजू उत्पादनांची बाजारपेठ वाढविणे आणि विक्रीला चालना देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच जीएफडीसीच्या इकोटुरिझम उपक्रमांचा विस्तार, पर्यटन सुविधांमध्ये सुधारणा आणि जनजागृती वाढविण्याच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.

Advertisement

गोव्याच्या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि प्रसार करताना स्थानिक समुदायांसाठी रोजगार व उपजीविकेच्या अधिक संधी निर्माण करण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले. महामंडळाचे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून शाश्वत विकासाला चालना देण्याचा उद्देश असल्याचे आमदार डॉ. देविया राणे यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.