For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देविका सिहागला विजेतेपद

06:26 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
देविका सिहागला विजेतेपद
Advertisement

वृत्तसंस्था/ बँकॉक

Advertisement

भारताची युवा बॅडमिंटनपटू देविका सिहागने बीडब्ल्यूएफ सुपर 300 थायलंड मास्टर्स स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावताना मलेशियाच्या गोह जिन वेईचा पराभव केला.

20 वर्षीय देविकाने जागतिक क्रमवारीत 68 व्या स्थानावर असणाऱ्या गोहविरुद्द 21-8, 6-3 अशी आघाडी घेतली असताना धोंडशिरेच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे देविकाला आजवरच्या छोट्या कारकिर्दीतील पहिले मोठे यश मिळविता आले. देविका जागतिक क्रमवारी 63 व्या स्थानावर असून बेंगळूरमधील पडुकोन-द्रविड सेंटर ऑफ स्पोर्ट्स एक्सलन्स येथे ट्रेनिंग घेते. याशिवाय पीव्ही सिंधूसह इंडोनेशियन प्रशिक्षक इ रवानस्याह आदि प्रतमा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणही घेत आहे.

Advertisement

अंतिम फेरी गाठल्याने देविका खुश झाली होती. पण अंतिम फेरी गाठण्याआधी झालेल्या लढतीत तिला तीन दीर्घ गेम्समध्ये संघर्ष करावा लागल्याने तिला थकवा आला होता. देविकाने ऑगस्ट 2025 मध्ये तिने मलेशिया इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद मिळविले. त्यानंतर तिने वर्ल्ड युनिव्हर्सिटी मिश्र सांघिक गेम्समध्ये भारताला कांस्य मिळवून देणाऱ्या संघात ती होती. याशिवाय मागील मोसमात इंडोनेशिया मास्टर्स सुपर 100 स्पर्धेत ती उपविजेती ठरली होती आणि 2024 मध्ये तिने चार स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. त्यापैकी स्विडिश ओपन व पोर्तुगाल इंटरनॅशनल स्पर्धा तिने जिंकल्या तर इस्टोनिया इंटरनॅशनल व डच इंटरनॅशनल या स्पर्धांत ती उपविजेती ठरली होती.

Advertisement
Tags :

.