For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवीका सिहाग अंतिम फेरीत

06:02 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
देवीका सिहाग अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ बँकॉक

Advertisement

येथे सुरु असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थायलंड मास्टर्स 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची युवा महिला बॅडमिंटनपटू देवीका सिहागने एकेरीची अंतिम फेरी गाठली.

250,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात भारताच्या बिगर मानांकित देवीका सिहागने 35 व्या मानांकित हुआंग यु हेसनचा 22-20, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 20 वर्षीय देवीकाची या स्पर्धेतील कामगिरी आतापर्यंत दर्जेदार झाली आहे. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुपर 300 दर्जाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच देवीकाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. आता देवीका सिहाहगचा अंतिम सामना मलेशियाच्या गोह वेई बरोबर होणार आहे. 2025 च्या ऑगस्टमध्ये देवीकाने मलेशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तसेच तिने 2025 च्या विश्व आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताला मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवून दिले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.