For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवगड- जामसंडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांचा भाजपात प्रवेश

05:37 PM Aug 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
देवगड  जामसंडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांचा भाजपात प्रवेश
Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या सदस्या मिताली सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सौ मिताली सावंत ह्या पूर्वीच भाजपाच्या गटामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र त्या राष्ट्रवादीतच होत्या. आज त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. गेले दोन अडीच वर्षात शिवसेनेची सत्ता असून देवगड-जामसंडे नगरवासियांना विकास पाहता आला नाही. याशिवाय कचरा, आरोग्य, स्ट्रीट लाईट, रस्ते व अन्य विकास कामे यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले. देवगड जामसांडे नगरपंचायतीचा विकास व्हायचा असेल तर आमदार नितेश राणे हाच शेवटचा पर्याय आहे. यामुळे आमदार नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून मिताली सावंत यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत विजय कदम, आनंद देवगडकर राजेश सावंत यावेळी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.