For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत देवगड हापूसची धडाकेबाज एन्ट्री ; डझनाला ६,१०० रुपयांचा विक्रमी भाव

06:40 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत देवगड हापूसची धडाकेबाज एन्ट्री   डझनाला ६ १०० रुपयांचा विक्रमी भाव
Advertisement

                                                   सांगलीत देवगड हापूस आंबा दाखल

Advertisement

सांगली : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा देवगड हापूस आंबा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सांगलीत दाखल झाला असून पहिल्याच सौद्यात विक्रमी दर मिळाल्याने आंबा व्यापारी व ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. येथील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये सोमवारी काढण्यात आलेल्या सौद्यात देवगड हापूस आंब्याला डझनाला तब्बल ६,१०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला.

हंगामाची केवळ सुरुवात असल्याने सध्या आंब्याची आवक मर्यादित आहे. आज बाजारात फक्त ६ ते ७ पेट्या देवगड हापूस आंब्याच्या दाखल झाल्या. यामध्ये सरासरी डझनाला ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याची माहिती व्याप्यांनी दिली. पहिल्या आठवड्यातच एवढा चांगला दर मिळाल्याने यंदाचा हापूस आंब्याचा हंगाम उत्साहवर्धक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement

व्यापाऱ्यांच्या मते, पुढील तीन ते चार आठवड्यांनंतर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणातवाढणार आहे. हवामान अनुकूल राहिल्यास यंदा हापूस आंब्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या दर जास्त असले तरी आवक वाढल्यानंतर दरात काहीशी घसरण होऊन सामान्य ग्राहकांनाही देवगड हापूस परवडणारा ठरेल, अशीअपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देवगड हापूसच्या लवकर आगमनामुळे सांगलीच्या फळ बाजारात नवचैतन्य निर्माण झाले असून येत्या काळात आंब्याचा सिद्वान अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत

Advertisement
Tags :

.