For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

रामाचा आदर्श घेता मग...फडणवीसांनी सगळेजण एकाच पक्षात असल्याचं जाहीर करावं

05:24 PM Dec 20, 2023 IST | Abhijeet Khandekar
रामाचा आदर्श घेता मग   फडणवीसांनी सगळेजण एकाच पक्षात असल्याचं जाहीर करावं
Devendra Fadnavis jayant Patil

गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे राज्यात फोडाफोडी करण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना गृहखातं पाहण्यास वेळ नसल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यामध्ये महिला सुरक्षित नसल्याचे सांगताना जयंत पाटील यांनी रामाला आदर्श सांगणारे राज्यातल्या सीता माईंचं रक्षण का करत नाहीत अशी विचारणाही त्यांनी गृमंत्र्यांना केली.

Advertisement

आज विधिमंडळ्याच्या हिवाळी अधिवेशनामध्य़े बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, "महाराष्ट्रात ८ हजारांहून अधिक दंगली झाल्या...बिहारमध्ये ४ हजार दंगली झाल्या. त्यामुळे आता आपल्याकडे दंगली घडवण्याचा विक्रम झाला आहे."

पुढे बोलताना ते म्हणाले, "हल्ली रामनवमीला दंगली होतात....दसऱ्यालाही काहीही होऊ शकतं. कोल्हापुरात कुठून माणसं आली हे माहीत नाही पण दंगल झाली. आम्हीही हिंदू आहोत पण इतरांच्या अभिमानाला आपण डिवचून चालणार नाही. केंद्र सरकारने पोलीस स्टेशन्सची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं एकाही पोलीस स्टेशन नाही त्यामुळे गृहखात्याच कामकाज कसं चाललं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. गृहमंत्र्यांना गृहखात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ते फक्त पक्ष फोडाफोडी करण्यात व्यस्त आहेत."असे त्यांनी म्हटले आहे. शेवटी बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांनी सगळे नेते आता एकाच पक्षात आहेत असं जाहीर करावं म्हणजे राज्यात शांतता प्रस्थापित होईल असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.