For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा विकसित, सुदृढ करण्यासाठी प्रयत्नशील ! पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

12:54 PM Aug 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
जिल्हा विकसित  सुदृढ करण्यासाठी प्रयत्नशील   पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
Advertisement

गुहागरातील वरवेली येथील 1 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन

गुहागर प्रतिनिधी

शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आपले काम आहे. नियोजन मंडळातून राज्यात सौर उर्जा प्रकल्प होत असताना रत्नागिरी जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा विकसित व सुदृढ बनविण्याचे आपले काम आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

Advertisement

गुहागर तालुक्यातील वरवेली येथे जिल्ह्यातील दुसऱ्या 1 मेगावॅट ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार भास्कर जाधव हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामंत म्हणाले की, नियोजन मंडळातील सर्वच सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प उभा करण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. आचारसंहितेनंतर भास्कर जाधव साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये नियोजन मंडळातर्फे निधी जाहीर करणार आहे. गुहागरातील पहिल्या चार प्रभाग संघांना पाच - पाच कोटीच्या हाऊस बोटी मंजूर केल्या आहेत.

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, या प्रकल्पातून 19 लाख युनिट वीज निर्मिती होणार असून तालुक्यातील पथदीपांचे वीज बिल यातून जाणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीवर पडणारा अतिरिक्त भार कमी होणार आहे. आपण ज्या पदावर आहोत त्या पदावरून लोकांच्या स्मरणात राहील असे काम केले पाहिजे असे शेवटी म्हणाले.

Advertisement

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार परिक्षित पाटील, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य निलेश सुर्वे, सरपंच नारायण आग्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी सभापती पूर्वी निमुणकर आदी उपस्थित होते.

आमदार जाधवांच्या पिंक कलर सदऱ्यामागे दडलंय काय ?
पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यासपीठावरून बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी परिधान केलेल्या पिंक रंगांच्या सदऱ्यावरून, यामागे नक्की दडलंय काय असा सवाल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही तोच रंग, गाडीचा रंगही तोच आणि आमदार जाधवांनीही हाच रंग समोर ठेवला. यामुळे यामागे नक्की दडलंय काय अशी राजकीय कोपरखळीही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी मारली.

Advertisement
Tags :

.