जिल्हाधिकारी कार्यालयाचा होणार विकास
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : अधिकाऱ्यांना सूचना : पार्किंग व्यवस्थाही करणार
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विकासाच्यादृष्टीने वेगाने काम करण्यात येत आहे. जुन्या इमारती जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वकिलांसाठी निर्माण करण्यात आलेल्या भुयारी मार्गातही बदल करून मुख्य रस्त्याच्या बाजूला लोखंडी जिना निर्माण करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जागेत व्हीआयपी पार्किंग तर आवारात आंदोलकांसाठी सुसज्ज जागा निर्माण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व परिसराची पाहणी करून विकासकामांबाबत अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
शहरातील वाहतूक कोंडी समस्या निकालात काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या हस्ते उ•ाणपुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सदर उ•ाणपूल गांधीनगर येथील संकम हॉटेल ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत निर्माण करण्यात येणार आहे. संकम हॉटेल ते अशोक सर्कल तेथून मध्यवर्ती बसस्थानक, तेथून किल्ला तलाव ते हायवेपर्यंत, तसेच अशोक सर्कल ते आरटीओ सर्कल यामधील काही भाग जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयापर्यंत जोडण्यात येणार आहे. यानंतर आरटीओ सर्कलमध्ये गोलाकार मार्ग बनवून तेथून सिव्हिल हॉस्पिटल, क्लब रोड या दिशेनेही मार्ग जोडण्यात येणार आहे. चन्नम्मा सर्कल ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत उ•ाणपूल होणार आहे.
उ•ाणपूल कामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाचाही विकास करण्यात येणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन विकासकामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विकासादरम्यान जुन्या इमारती जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नव्या सुसज्ज इमारती बांधण्यात येणार आहेत. आंदोलकांसाठी राखीव जागाही ठेवण्यात येणार असून पार्किंग व्यवस्थाही करण्यात येणार आहे. यादृष्टीने अधिकाऱ्यांकडून वेगाने कामे करण्यात येत आहेत.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारात वाहनांची वर्दळ होत आहे. परिणामी काहीवेळा वाहने बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्याच वाहनाला जाण्यासाठी जागा नसते. याचा विचार करून कार्यालयासमोरील जागेत व्हीआयपी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारापासून सरळ पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. पर्यायी म्हणून मुख्य रस्त्याच्या बाजूला भुयारी मार्गातून जाण्यासाठी लोखंडी जिना निर्माण करण्यात आला आहे.