महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसकडून नाही, दानशूर व्यक्तींकडून ‘केएलई’चा विकास

11:31 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जाहीर माफी मागावी

Advertisement

बेळगाव : 108 वर्षांचा इतिहास असलेल्या केएलई संस्थेला अनेक दानशूर व्यक्तींकडून मदत देण्यात आल्याने संस्थेचा विकास झाला आहे. संस्थेचा इतिहास माहिती नसताना बालिश प्रतिक्रिया देणे उचित नाही, असे प्रत्युत्तर केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिले असून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिलेली प्रतिक्रिया मागे घेऊन जाहीर माफी मागावी, असे त्यांनी सांगितले. केएलई विद्यापीठामध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस सरकारकडून केवळ एक रुपयामध्ये जमीन दिल्याने केएलई रुग्णालय आणि विद्यापीठाचा विकास झाला आहे, असे सांगितले होते. या प्रतिक्रियेवर डॉ. प्रभाकर कोरे यांनी प्रत्युत्तर दिले असून याचे खंडण केले आहे. दानशूर व्यक्ती असणाऱ्या शिरसंगीचे लिंगराज, राजा लखमगौड, भूमरे•ाr बसप्पण्णावर अशा त्यागी वृत्तीच्या व्यक्तींमुळे केएलईचा विकास झाला आहे. या ठिकाणी काँग्रेस, भाजप या पक्षांचा प्रश्नच उद्भवत नाही.

Advertisement

केएलई संस्थेने स्वत:च्या पैशातून मालमत्ता खरेदी केली आहे. तत्कालीन कालावधीमध्ये पक्षांकडून मदत, सहकार्य मिळविले आहे. मात्र केवळ काँग्रेसकडून केएलई संस्थेने रुग्णालय उभारले, विद्यापीठाची स्थापना केली, अशी प्रतिक्रिया वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. केएलई संस्थेचा इतिहास व्यवस्थितपणे अर्थ करून घ्यावा. केएलई संस्थेचा विकास काँग्रेसमुळे झाला ही प्रतिक्रिया चुकीची असून याचे खंडण करतो, असे डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले. केएलई संस्थेच्या संचालक मंडळामध्ये सर्व राजकीय पक्षांचे समर्थक आहेत. याचा अर्थ असा नाही की कोणत्याही एकाच राजकीय पक्षाशी बांधिल आहोत. वैयक्तिकरित्या त्यांचे समर्थन त्यांनी पहावे, शिक्षण संस्थेमध्ये आपण राजकारण आणत नाही. मात्र संस्थेच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेतो, असे डॉ. कोरे यांनी सांगितले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शिक्षण संस्थेचा खरा इतिहास समजून घेतलेला नसल्याचे दिसते. इतिहासाची माहिती नसताना कोणतीही प्रतिक्रिया देणे सामंज्यसपणाचे नाही. केएलई संस्थेचा इतिहास माहिती करून न घेता मतांसाठी खोटी प्रतिक्रिया देऊन जनतेच्या भावनांशी खेळणे काँग्रेसला शोभत नाही. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलेले वक्तव्य मागे घेऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी डॉ. प्रभाकर कोरे यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article