देवेगौडा इस्पितळात दाखल
10:29 AM Oct 08, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : माजी पंतप्रधान आणि निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. देवेगौडा यांना ताप आल्यामुळे 92 वर्षीय देवेगौडा यांना बेंगळूरच्या मणिपाल इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. उतार वयातही देवेगौडा पक्ष संघटना आणि पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरात दौरे करत आहेत. मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article