महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हृदयरुग्णांचे देवदूत डॉ. एम. डी. दीक्षित

10:39 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूतच असतो. त्यांच्या कौशल्याने व ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. ‘सिर्फ नाम ही काफी है!’ या वाक्यानुसार हजारो रुग्णांना पुनर्जन्म देणाऱ्या प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. एम. डी. दीक्षित यांचा आज वाढदिवस. डॉ. दीक्षित यांच्याबाबत सांगायचे झाले तर एक प्रेमळ, नि:स्वार्थी त्यांच्यारुपी देवदूतच आपल्यासमोर उभा आहे, असे वाटते. अशा या रुग्णसेवेप्रति दक्ष असणाऱ्या डॉ. एम. डी. दीक्षित यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Advertisement

डॉ. एम. डी. दीक्षित यांनी 1980 मध्ये बेळगाव येथील जेएनएमसी महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी मिळविली. 1984 मध्ये एमएस तर 1989 मध्ये डीएनबी पदवी मिळविली. त्यांनी 2011 मध्ये आपल्या अभ्यासू जिज्ञासेतून बायपास शस्त्रक्रियेवर पीएचडी पदवी मिळविली आहे. आपल्या 33 वर्षांच्या डॉक्टरी पेशाच्या कारकिर्दीत डॉ. दीक्षित यांनी 35 हजारहून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामध्ये 10 हजारांहून अधिक लहान मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. या प्रदीर्घ अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना नवजीवन दिले असून रुग्ण व नातेवाईक त्यांना खरोखरच चालता बोलता देवच संबोधतात.

Advertisement

डॉ. दीक्षित हे कर्नाटकातील पहिले रोबोटिक हृदय शास्त्रक्रिया करणारे पहिले डॉक्टर असून त्यांनी 900 ग्रॅम वजनाच्या नवजात शिशुवरही यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केली आहे. या त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणून कर्नाटक सरकारने त्यांना 2004 मध्ये मानाच्या कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना अनेक संघ-संस्थांकडूनही विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. डॉ. एम. डी. दीक्षित हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे मानद सदस्य असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्था कार्यरत आहेत.

सात महिन्यांच्या गर्भवतीवर यशस्वी ‘हृदय शस्त्रक्रिया’

यंदा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारी रोजी डॉ. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर महिलेवर डॉ. दीक्षित यांनी लिमा-रिमा या तंत्राचा वापर करून ट्रिपल बायपास सर्जरी (ओपन हार्ट सर्जरी) केली आहे. दहा दिवसांच्या एका नवजात बालकावरही त्यांनी यशस्वी शास्त्रक्रिया केली आहे. कितीही अवघड व जटिल शस्त्रक्रिया म्हटले की डोळ्यासमोर एकच आशेचा किरण दिसतो, तो म्हणजे डॉ. एम डी. दीक्षित!

सामान्य रुग्णांना सर्वोत्कृष्ट रुग्णसेवा मिळावी, या उद्देशाने डॉ. दीक्षित व सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी अरिहंत हॉस्पिटलची स्थापना केली. हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर योग्य उपचार करण्यात आले आहेत. नुकताच या रुग्णसेवेची पोहोच पावती म्हणून हॉस्पिटलला मानाच्या एनएबीएच संस्थेकडून पूर्ण मान्यता मिळाली आहे. याद्वारे रुग्णसेवेत आणखी भर पडणार आहे. डॉ. दीक्षित हे उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व गोव्यातील रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. प्रदीर्घ अनुभवांतून त्यांनी रुग्णांना जीवन तर दिले आहेच त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर रुग्णसेवेच्या माध्यमातून हास्य फुलविले आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला व त्यांच्या नि:स्वार्थ रुग्णसेवेला सलाम. एक प्रेमळ डॉक्टर म्हणून परिचित असणाऱ्या डॉ. एम. डी. दीक्षित यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

- अरिहंत उद्योग समूह, बोरगाव

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article