For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

देवबागमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा; 46 बॉक्स जप्त

12:24 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
देवबागमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा  46 बॉक्स जप्त
Advertisement
मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग येथे गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीविरोधात मालवण पोलिसांनी धडक कारवाई केली. 3 नोव्हेंबर रोजी रात्री करण्यात आलेल्या छापेमारीत गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल 46 बॉक्स जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत 2 लाख 20 हजार 800 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी कॅलीस डॉमिनिक डिसोजा (रा. देवबाग, ता. मालवण) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. देवबाग परिसरात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून दारूचा साठा जप्त केला.

Advertisement

पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार आणि हेड कॉन्स्टेबल सोनाली पाटकर यांचा समावेश होता.

Advertisement

मालवण तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून, बेकायदेशीर व्यवसायांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :

.