अॅक्शन-थ्रिलरपटात दिसणार देव पटेल
1300 च्या दशकातील अनोखी कहाणी
अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक देव पटेल स्वत:च्या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. देव पटेल आता दिग्दर्शक म्हणून देखील काम करत आहे. अभिनेता आता पीरियड अॅक्शन-थ्रिलर पट ‘द पीजेंट’मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात तो अभिनयासह दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. द पीजेंटची कहाणी मध्यकालीन भारतावर आधारित असेल. देव पटेलने यापूर्वी मंकी मॅन चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. फिफ्थ सीझन आणि थंडर रोडच्या समर्थनाने निर्माण होणारा द पीजेंट चित्रपट कथित स्वरुपात ब्रेवहार्ट, जॉन विक आणि किंग आर्थरने प्रभावित असेल असे समजते. 1300 च्या दशकातील भारताच्या एका गुराख्यावर आधारित हा चित्रपट असून तो स्वत:च्या समुदायाला नष्ट करणाऱ्या टोळीच्या विरोधात विद्रोह करतो. यादरम्यान त्याचे असे रुप समोर येते, ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते. देव पटेलने दिग्दर्शित केलेला मंकी मॅन हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते.