For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देव मीनाचा राष्ट्रीय विक्रम, पण सातवे स्थान

06:11 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
देव मीनाचा राष्ट्रीय विक्रम  पण सातवे स्थान
Advertisement

वृत्तसंस्था, नागोया

Advertisement

देव मीनाने 5.50 मी.ची उंची गाठत स्वत:ची सर्वोत्तम कामगिरी आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला व पुरुषांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात सातवे स्थान मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा शानदार समारोप केला. 22 वर्षीय मीनाने दुसऱ्या प्रयत्नात ही उंची गाठली आणि आपलाच राष्ट्रीय विक्रम सुधारला. आंतरराष्ट्रीय स्तरावर या पातळीवर स्पर्धा करण्यास नुकतीच सुरुवात केलेल्या मीनाची कामगिरी प्रभावी ठरली. याच प्रकारातील दुसरा भारतीय खेळाडू कुलदीप कुमारने 5.35 मी.ची उंची गाठत 10 वे स्थान मिळवले. भारताच्या पूजा ओल्ला आणि मोहम्मद अफजल यांनी अनुक्रमे महिलांच्या आणि पुरुषांच्या 800 मी. शर्यतीत सातवे व आठवे स्थान पटकावले.

Advertisement
Advertisement
Tags :

.