तडीपारीचा गुन्हेगारीवर वचक
गुन्हेगारांना संपविले म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती संपत नाही. गुन्हेगारांना संपवायचे असेल तर त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती संपवावी लागेल आणि तेच कठीण काम असते. तेव्हा कुठे गुन्हेगार गुन्हा करणार नाहीत. ही प्रवृत्ती संपवायची असेल तर एक तर कठोर शिक्षा किंवा तडीपारी. याच गोष्टी गुन्हेगार आणि त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवतील.
बरं झालं निसर्गानं कुणालाही आजीवन तरूण ठेवलं नाही, अन्यथा माणसाचा नक्कीच सैतान झाला असता. ही नाराजगी व्यक्त केली आहे मुंबई उच्च न्यायालयाने. देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांना मारहाण करणारा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनावर सुनावणी घेताना न्यायालयाने वरील शब्दात नाराजगी व्यक्त केली आहे. मात्र हा खरा संताप आहे. सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या या नगरसेवकाचा इतिहास देखील गुन्हेगारी स्वऊपाचा आहे. कायद्यापुढे सर्व समान. त्याप्रमाणे, न्यायालयाने म्हात्रेला अटक केल्यानंतर जामीन देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. माजोरड्या म्हात्रेचा माज जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत न्यायालयाने म्हात्रेची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र प्रकृतीचे कारण पुढे करीत म्हात्रे अक्षरश: न्यायालयाला शरण गेला. शरण म्हणण्यापेक्षा गडाबडा लोळला हा शब्द देखील कमी पडेल, असा म्हात्रे हतबल झाला होता. यावेळी त्याचा सत्तेचा माज पूर्ण निघुन गेला होता. ‘मला राज्याच्या बाहेर तडीपार करा पण तुऊंगातून बाहेर काढा’ अशी विनंती तो न्यायालयाला करीत होता. अखेर न्यायालयाने म्हात्रेचा पूर्वइतिहास पाहता जोपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत म्हात्रेला राज्यातून तडीपार करीत पोलीस बंदोबस्तात गोव्याला हलविले. तेही पोलिसांची नजर चुकवून म्हात्रे मुंबईत येऊ नये, असे स्पष्ट आदेश पोलिसांना देण्यात आले. म्हात्रेची तडीपारी म्हणजेच त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक आहे. अशाच प्रकारे गुन्हेगार आणि त्यांच्या प्रवृत्तीवर वचक बसविण्यासाठी मुंबई पोलिसांनी तडीपारीचा धडाका सुऊ केला आहे.
मुंबई, पुण्यातील गुन्हेगारांनी ज्या ज्या वेळेस गुन्हेगारीचा कळस गाठला त्या त्या वेळेस पोलिसांनी तडीपारीचे अस्त्र बाहेर काढले आहे. तडीपारीमुळे बऱ्यापैकी गुन्हेगारांच्या प्रवृत्तांrना आळा बसलेला आहे. मात्र काही तडीपार गुन्हेगार पोलिसांची नजर चुकवून पुन्हा मुंबई-पुण्यात आल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. अशावेळी पोलिसांनी या गुन्हेगारांच्या पुन्हा मुसक्या आवळून त्यांना शहराबाहेर काढले आहे. मात्र तडीपारी ही जोपर्यंत मुदत संपत नाही तोपर्यंत कायमस्वऊपी ठेवली आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी बोरिवली, कस्तुरबा, समता नगर,
दहिसर परिसरात खंडणी, जबरी चोरी, हप्ते
वसुली करणाऱ्या एक डझन घातक गुंडांना मुंबई शहर आणि उपनगरातून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. मुंबईतून हद्दपार करण्यात आलेल्या 12 आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवून शिवीगाळ आणि मारहाण करून सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला होता. नागरिक भयभीत झाले होते. पोलिसांकडे तक्रार करण्यास घाबरत होते. अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि मुंबईतून हद्दपार करण्यात आलेले गुंड पुन्हा मुंबई शहरात दिसल्यास किंवा वावरत असल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना किंवा पोलिसांच्या आपत्कालीन 100 तसेच 112 या दूरध्वनी क्रमांकांवर कळवावी असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांना जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात तडीपारीप्रमाणे एमपीडीए म्हणजे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटीझ
ऑफ स्लमलॉर्डस् आदी कलमांन्वये कठोर कारवाई (झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, वाळू तस्कर आदी धोकादायक व्यक्तीविऊद्ध) करण्यात यावी असेही आयुक्तांचे आदेश आहेत. वास्तविक तडीपारीचा इतिहास जर पाहिला तर मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त सर फ्रँक हेन्री साऊटर होते. 1860 च्या सुमारास मुंबई झपाट्याने वाढत होती. सात बेटांचे शहर असलेल्या मुंबईचा विकास ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीने सुरू केला होता. मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या आणि बंदर असलेल्या मुंबईत देशभरातून लोक स्थलांतरित होऊ लागले होते. या स्थलांतराबरोबरच मुंबईत गुन्हेगारांनी देखील शिरकाव केला होता. संघटित गुन्हेगारी वाढली तेव्हा मुंबईचे त्यावेळचे पोलीस आयुक्त सर फ्रँक साऊटर यांनी दरोडेखोर आणि सराईत गुन्हेगारांविऊद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. गुन्हे घडण्यापूर्वीच त्यांना शहराबाहेर तडीपार करण्यास सुऊवात केली. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आले, परंतु दरोडेखोरी काही थांबली नाही. ती आजही सुरूच आहे. सर फ्रँक साऊटर या ब्रिटिश पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या तडीपारीची अंमलबजावणी मुंबई पोलीस आजही करीत आहेत.
स्वातंत्र्यानंतर मुंबई शहरांत खुलेआम तस्करी सुऊ झाली. या तस्करीमध्ये बंदर तस्करी, दादा संस्कृती होती. ती करीम लाला, हाजी मस्तान, वरद राजन, दाऊद या भाईंनी सत्तर-ऐंशीच्या दशकात वाढविली. नेमके याचदरम्यान संघटित अंडरवर्ल्ड उदयाला आले. हाजी मस्तान, करीम लाला, वरद राजन आदी गुंडांवर मुंबई पोलिसांनी मिसा, एनएसएसारख्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. आणीबाणीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये त्यांना जेरबंद केले होते. त्यानंतरच हाजी मस्तान आणि करीम लालाने अंडरवर्ल्डमधून निवफत्ती घेतली, तर दाऊदने दुबईत पलायन केले. मुंबई पोलिसांनी मोक्का कायदा अमलात आणून दाऊद, छोटा राजन, अऊण गवळी, अमर नाईक आदी टोळ्यांमधील गँगवॉरच संपवून टाकले, परंतु गल्लीबोळात, मोहल्ल्या-मोहल्ल्यांत दमदाटी, हप्ते वसुली तसेच अवैध धंदे करणाऱ्यांना फारसा चाप बसला नव्हता. अशातच देवेन भारती यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभरात 1 हजार 117 गुंडांना मुंबईतून तडीपार केले आहे, तर 22 जणांवर एमपीडीएची कारवाई केली आहे.
अमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या 46 जणांना मोक्का आणि अमली विरोधी कायद्यान्वये जेरबंद केले आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये 51 जणांवर कारवाई केली आहे. पोलीस तडीपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांना मुंबईतून हद्दपार करतात, परंतु ते गुन्हेगार पुन्हा शहरात येऊन सक्रिय होतात. पोलीस त्यांना पुन्हा अटक करतात, परंतु न्यायालय कायद्यातील तरतुदींप्रमाणे त्यांची जामिनावर सुटका करते. त्यामुळे गुन्हेगारांना पुन्हा रान मोकळे होते. म्हात्रे सारख्या मारकुट्या नगरसेवकांना राजकीय पाठबळ असल्यावर आणखी काय होणार? भविष्यात या म्हात्रेने कायद्यातील कोणतीही पळवाट न शोधता किंवा राजकीय आधार न घेता तडीपारी संपण्याच्या आतच पुन्हा राज्यात पाय ठेऊ नये, याची खबरदारी वेळीच घेणे आवश्यक आहे.
अमोल राऊत