महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार
मालवण शहर भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची प्रचारात आघाडी
मालवण | प्रतिनिधी :
महायुतीचे कुडाळ मालवण मतदारसंघ उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपा महिला पदाधिकारी यांनी आघाडी घेतली आहे. मतदारसंघाच्या गतिमान विकासासाठी 'बदल हवा तर आमदार नवा' हाच सुर सगळीकडे दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. मालवण भाजपा शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर यांनी प्रमुख महिला पदाधिकारी यांच्या सोबत बूथ निहाय गाठीभेटी घेत विकास कामांची व सर्व योजनांची माहिती देत आहेत. जनतेतूनही चांगला प्रतिसाद मिळतं आहे. 'बदल हवा तर आमदार नवा' हेच चित्र दिसून येत आहे. निलेश राणे आमदार म्हणून विजयी होणारच, त्यांचा विजय निश्चित आहे. मात्र आम्हाला मोठया मताधिक्याने विजय हवा आहे. यासाठी महायुती प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता जोमाने काम करत आहे. असेही अन्वेषा आचरेकर यांनी सांगितले.
यावेळी महिला आघाडी प्रचार प्रमुख शर्वरी पाटकर, मालवण शहर उपाध्यक्षा वैष्णवी मोंडकर, चिटणीस महिमा मयेकर चिटनीस, प्रचार प्रमुख महानंदा खानोलकर, स्मिता प्रभाळे, नंदिनी हडकर यांसह अन्य महिला पदाधिकारी सातत्याने प्रचारात कार्यरत आहेत. जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळतं असून महायुती सरकार पुन्हा येणार, मालवण कुडाळ मधून निलेश राणे विजयी होणार हा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सरकारवर जनता समाधानी
महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात अनेक जनहिताचे निर्णय घेण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या अनेक जनहिच्या योजना आहेत. आमचे हक्काचे खासदार राणे साहेब आहेत. एकूणच केंद्र व राज्य सरकार माध्यमातूम शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांना अग्रक्रम देऊन योजना उपक्रम राबवण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरात पोहचली. जनता समाधानी असून पुन्हा एकदा राज्यात महायुती सरकार येणार कुडाळ मालवण मधून निलेश राणे आमदार होणार जनतेचा निर्णय पक्का झाला आहे. असा विश्वास अन्वेषा आचरेकर यांनी व्यक्त केला आहे.