कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मच्छरांपासून वाचविणार डिटर्जेंट

06:37 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयआयटी दिल्लीचा शोध

Advertisement

मच्छरांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे धोकादायक आजार फैलावतात. आतापर्यंत आम्ही क्रीम, लोशन, स्प्रे, अगरबत्ती किंवा पॅच लावून बचाव करत होतो, परंतु हे काही तासांनी कमजोर ठरतात. आता आयआयटी दिल्लीने एकदम नवी आणि सोपी पद्धत शोधली आहे.

Advertisement

आयआयटी दिल्लीच्या टेक्सटाइल आणि फायबर इंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक जावेद नबीबख्श शेख आणि त्यांच्या टीमने पावडर आणि लिक्विड दोन्ही प्रकारचे डिटर्जेंट तयार केले आहेत. हे डिटर्जेंट पाहण्यास आणि वापर करण्यास सामान्य डिटर्जेंटप्रमाणेच आहेत. या डिटर्जेंटमध्ये काही खास रसायने मिसळण्यात आली असून जे कपड्यांच्या फायबरमध्ये चिकटतात. जेव्हा मच्छर या कपड्यांवर बसण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला कपडे दुर्गंधयुक्त आणि बेस्वाद वाटते, याचमुळे मच्छर पळून जातात. मच्छर कपड्याला सहजपणे चिरू शकतो, परंतु आता  कपड्यावर बसणारच नसल्याने चावणार कसा?

परीक्षणात 100 टक्के यशस्वी

या डिटर्जेंटला मोठ्या कमर्शियल लॅबमध्ये टेस्ट करण्यात आले आहे. स्वयंसेवकांनी या डिटर्जंटने धुतलेले कपडे परिधान केले आणि स्वत:चा हात उपाशी मच्छरांनी भरलेल्या बॉक्समध्ये टाकला, सामान्य कपड्यावर 20-30 मच्छर बसतात, परंतु या खास डिटर्जेंटने धुतलेल्या कपड्यावर मच्छर बसतच नव्हते.

प्रत्येक धुण्यात नवी शक्ती

सामान्य क्रीम-स्पे काही तासांनी निष्प्रभ ठरतो. परंतु हा डिटर्जेंट प्रत्येकवेळी कपडे धुतल्यावर नवी सुरक्षा देतो. जितक्या वेळा कपडे धुतले जातील, तितक्या वेळा मच्छर पळवून लावण्याची शक्ती ताजी होत जाते. मच्छरांपासून वाचविणारा स्मार्ट डिटर्जेंट तयार केला आहे. हा डिटर्जेंट मच्छरांची हुंगण्याची आणि स्वाद शक्ती खराब करतो. आम्ही या डिटर्जेंटसाठी पेटंट अर्जही केला आहे. हा डिटर्जेंट लवकरच बाजारात येईल असे प्राध्यापक जावेद शेख यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article