For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News | साडेचार कोटींचा निधी मंजूर होऊनही ओगलेवाडीत 'रस्ता' रखडला; शेतकऱ्यांच्या वादात नागरिक भरडले!

03:42 PM Apr 23, 2026 IST | NEETA POTDAR
karad news   साडेचार कोटींचा निधी मंजूर होऊनही ओगलेवाडीत  रस्ता  रखडला  शेतकऱ्यांच्या वादात नागरिक भरडले
Advertisement

                  ओगलेवाडीत रस्ता काम हद्द वादात अडकले

Advertisement

ओगलेवाडी: गजानन हौसिंग सोसायटी गोवारे (ता.कराड) येथील गणपती मंदिरापासून एमएसईबी मार्गे विरवडेकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुमारे साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. या रस्त्याचे बहुतांश कामही झाले. मात्र वनिता फौंड्री नजीक दोन शेतकऱ्यांच्या हद्दीच्या वादातून येथील सुमारे ३०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम रखडले आहे. मुदत संपली तरी वाद मिटला नसल्याने शिल्लककामाचा निधी परत गेला.

सध्या या रस्त्यावरून गटाराचे पाणी वाहत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गजानन हौसिंग सोसायटी ते एमएसईबी दरम्याचा सुमारे दोन किमीचा रस्ता सैदापूर, गोवारे, हजारमाची व विरवडे या चार ग्रामपंचायतीच्या हद्दीत येता. या रस्त्याच्या दुतर्फा चारही ग्रामपंचायतीची लोकवसाहत आहे. तर ओगलेवाडी औद्यागिक वसाहत, ओगलेवाडी विभागीय वीज वितरणचे कार्यालय असल्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अनेक वर्षे निधी उपलब्ध झाला नसल्याने रस्त्याचीप्रचंड दुरवस्था झाली होती. या रस्त्याची दुरूस्ती व्हावीयासाठी येथील नागरीकांनी अनेक वर्षे संघर्ष केला, आदोलने केली. लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेतल्या, मात्र निधी मिळाला नाही. अनेक वर्षे जंग जंग पछाडल्यानंर रस्त्याच्या कामासाठी साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला.

Advertisement

गजानन हौसिंग सोसायटी ते वनिता फाँड्रीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण केले. वनिता फाँड्री नजिक दोन शेतकऱ्यांच्या हद्दीच्या वादातून रस्त्याचे काम रखडले. ठेकेदाराने वादग्रस्त तीनशे मीटरचा भाग सोडून पुढे करवडी पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण केले.दोन शेतकऱ्यांच्या हद्दीच्या वादात शेकडो लोकांना त्रास होत आहे. सगळे प्रयत्न करून थकले मात्र रस्ता झाला नाही. त्यामुळे आता बांधकाम विभागाने रितसर नियमाप्रमाणे रस्त्याची हद्द निश्चित करून गटर व रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा महाराष्ट्रदिनी येथील रहिवाशांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार आहे.
प्रवीण नांगरे, रहिवासी या दोन शेतकऱ्यांतील हद्दीचा वाद मिटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, मात्र त्यास यश आले नाही. सरकारी मोजणी झाली तीही शेतकऱ्यांना मान्य मान्य नाही. अखेर कामाची मुदत संपल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कामाचा निधी परत गेला.

Advertisement
Tags :

.