Sangli News | मोरेवाडीत जलसेतूचा जॉइंट रबर तुटला! वारणा डाव्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया
लाखोंचा निधी खर्चूनही वारणा कालव्याची गळती कायम
कोकरुड : विधान परिषदेचे माजीसभापती कै. शिवाजीराव देशमुख यांच्या कल्पनेतून निर्माण झालेला वारणा डावा कालबा चांदोली धरणाच्या डाव्या बाजूने तयार करण्यात आला. शेतकऱ्यांना स्वस्त पाटाचे मुबलक पाणी मिळावे या
हेतूने बारणा डावा कालवा प्रवाही करण्यात आला. मात्र अपुरा निधी, कालव्यास गळती हे प्रश्न उभे राहिले. गळती थांबवण्यासाठी कालव्याच्या अस्तरीकरणासाठी लाखोंचा निधी मंजूर करून काम करण्यात आले. काही ठिकाणी अद्यापही गळती सुरूचआहे.
अद्यापही वारणा डावा कालवा पूर्णत्वाकडे गेलेला नाही. निधीच्या कमतरतेमुळे काही कामे प्रलंबित आहेत.मोरेवाडी येथील हद्दीतून शाहूवाडी तालुक्याला कालव्याचे पाणी देण्यासाठी जलसेतू उभारला आहे. या जलसेतूचा जॉइंट रबर तुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी जलसेतू खालील शेतकयांच्या पिकाबू जमिनीत कोसळत असून पिकांची नासाडी झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. त्यातच ही पाण्याची नासाडी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्र उपस्थित होत आहे. पाटबंधारे विभागाने येथील पाण्याची गळती थांबवण्याची मागणी होत आहे.