For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा

07:00 AM Aug 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा
Advertisement

अभिनेत्री कुब्रा सैत लवकरच काजोलसोबत ‘ट्रायल सीझन 2’मध्ये नजर दिसून येणार आहे. अलिकडेच तिने ‘सन ऑफ सरदार 2’मध्ये काम केले होते. कुब्राने आता चित्रपटसृष्टीतील अनुभव, क्षेत्रात घडलेले बदल आणि आगामी प्रोजेक्ट्सविषयी माहिती दिली आहे. जर मला कुठलीही भूमिका साकारायची असेल तर ती माझ्यासाठी मी लिहू शकते. सध्या मी स्वत: साकारलेल्या व्यक्तिरेखांचा आनंद घेत आहे. जर संधी मिळाली तर मी कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यास तयार आहे. त्यांचे जीवन आणि कामगिरी अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांच्या साहसला पडद्यावर साकारणे माझ्यासाठी अत्यंत खास अनुभव असेल. हे माझ्यासाठी केवळ एक अभिनयाची संधी नाही, तर सन्मान आणि प्रेरणेचेही कारण ठरेल, असे उद्गार कुब्रा यांनी काढले आहेत. कुब्रा ही डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट ‘जवानी तो इश्क होना है’मध्येही दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी वरुण धवन आणि मनीष पॉल यांच्यासोबत काम केले आहे. आम्ही याचे चित्रिकरण स्कॉटलंडमध्ये केले असल्याचे कुब्राने सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.