देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशजाची आत्महत्या
04:33 PM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
देहू : प्रसिद्ध धर्मोपदेशक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांनी त्यांच्या राहत्या घरी आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे देहू गावातील तीर्थक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. देहूरोड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचा अंत्यसंस्कार आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असे कुटुंब आहे. या घटनेने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Advertisement
Advertisement