कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत देर्देकर प्रथम तर विचारे द्वितीय

11:30 AM Sep 11, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

गुहागर :

Advertisement

नेहमीच विविध उपक्रम राबवणाऱ्या शिवसेना (युवासेना), गुहागर यांच्या वतीने नुकतीच गुहागर तालुका मर्यादित पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सत्यवान देर्देकर (परचुरी) यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर मकरंद विचारे (वरवेली) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

Advertisement

या स्पर्धेमध्ये एकूण ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या सजावटीचा २ मिनिटांचा व्हिडिओ आयोजकांकडे पाठवला होता. प्राप्त व्हिडिओंच्या परीक्षणानंतर पाच विजेत्यांची निवड करण्यात आली.

प्रथम क्रमांक – सत्यवान देर्देकर (परचुरी) ₹11,111 रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक – मकरंद विचारे (वरवेली)
₹7,777 रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक – समीर महाडीक (वरवेली) ₹5,555 रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, चतुर्थ क्रमांक – सोहम पवार (देवघर) ₹3,333 रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, पाचवा क्रमांक – यश गुजर (देवघर) ₹2,222 रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा शांताई रिसॉर्ट, गुहागर येथे बुधवार दिनांक [तारीख] रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. या कार्यक्रमाला विपुल कदम, महेश नाटेकर, प्रदीप सुर्वे, नेत्रा ठाकूर, अमरदीप परचुरे, निलेश मोरे, सागर गुजर, विक्रांत चव्हाण, अनुराग उतेकर, अमोल गोयथळे, महेश जामसूतकर, कुणाल देसाई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article