कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अपर जिल्हाधिकाऱ्यांना संजय शिंदे ‘उत्तम कार्यकर्ता’ पुरस्कार

05:18 PM Feb 10, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने उल्लेखनीय कार्याबद्दल कोल्हापूर‘चे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग, शाखा अभियंता पुनम पाटील यांना ‘उत्तम कार्यकर्ता’ पुरस्काराने गौरविण्यात आले.  तसेच कोल्हापूर जिल्हा आदर्श समन्वय समिती पुरस्कार घेताना मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन नूकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबईचे डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते अधिकारी महासंघ कल्याण केंद्र नियोजित बांद्रा येथे आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त सात जिल्हा समन्वय समिती आणि संपूर्ण राज्यातून निवडक 26 उत्तम कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.
अधिकारी महासंघाच्या आग्रही मागणी, अभ्यासपूर्ण मांडणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अनेक प्रलंबित प्रश्न संबंधित शासनाचे सकारात्मक निर्णय होत आहेत. यावेळी महासंघाचे मुख्य सल्लागार तथा संस्थापक ग.दी. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, कोषाध्यक्ष नितीन काळे,सरचिटणीस समीर भाटकर आणि दुर्गा महिला मंचच्या अध्यक्ष सिद्धी संकपाळ आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article