For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News : कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक

04:26 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
karad news   कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक
Advertisement

                   राज्याचे उपमुख्यमंत्री कराडमध्ये; स्व. यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली

Advertisement

कराड : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी येथील प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. श्रीमती पवार यांच्या भेटीने भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील,माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, राष्ट्रवादीचे नेते अॅङ उदयसिंह पाटील, सारंग पाटील, राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, सुनीलमाने, रूपाली ठोंबरे, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, नंदकुमार बटाणे, प्रशांत यादव, जितेंद्र डुबल, सुनील पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व महिला नि उपस्थित होत्या.

Advertisement

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली.

Advertisement
Tags :

.