Eknath Shinde | रोजची ४ ते ५ किलोमीटरची पायपीट थांबली! एकनाथ शिंदेंनी 'या' दुर्गम भागातील पोरांना दिलं मोठं सरप्राईज
सातारा -कोयना–कांदाटी खोऱ्यातील दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत होती. या विद्यार्थ्यांच्या अडचणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत तब्बल २५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले.
गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवास अधिक सोपा व्हावा आणि वेळ व श्रम वाचावेत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवीन सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. रोज पायी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सायकलने शिक्षणाचा प्रवास करता येणार आहे.
गावी दौऱ्यावर असताना अनेक वेळा विद्यार्थ्यांची पायपीट त्यांनी पाहिली होती आणि त्यातूनच कायमस्वरूपी मदतीचा हा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात आहे. या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिक आणि पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.