For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडगाव-येळ्ळूर क्रॉस बसथांब्याची दयनीय अवस्था

12:27 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
वडगाव येळ्ळूर क्रॉस बसथांब्याची दयनीय अवस्था
Advertisement

दुरुस्तीकडे दुर्लक्ष, वाहने आत प्रवासी बाहेर : बसथांब्याला ना छप्पर ना आसन व्यवस्था

Advertisement

बेळगाव : वडगाव-येळ्ळूर क्रॉसमधील बसथांब्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. बसथांब्यामध्ये आसन व्यवस्था नसून छप्पर नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर बसथांब्यामध्ये नागरिक आपली वाहने पार्किंग करून जात आहेत. यामुळे गाड्या बसथांब्यामध्ये तर प्रवासी बाहेर असे काहीसे चित्र दिसून येत आहे. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बसथांब्याची दुरुस्ती करून प्रवाशांसाठी अनुकूल करून देण्याची मागणी होत आहे.

वडगाव-येळ्ळूर क्रॉसमधून येळ्ळूर, धामणे, सुळगा आदी गावांना जाण्यासाठी बसथांबा निर्माण करण्यात आला आहे. मात्र या बसथांब्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे. सदर बसथांबा ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा आहे. मात्र बसथांब्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. प्रवाशांना बसथांब्यामध्ये राहण्याऐवजी इतर ठिकाणी बसेसच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या समस्यांची दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Advertisement

बसथांब्याची लवकरात लवकर दुरुस्ती करा

या बसथांब्यामध्ये नागरिक आपली वाहने पार्क करून जात आहेत. यामुळे गाड्या आत, प्रवासी बाहेर अशी परिस्थिती दिसून येत आहे. बसथांब्यामध्ये आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही. यामुळे त्यांना दुकानांच्या पायऱ्यांवर किंवा झाडांच्या सावलीत थांबावे लागत आहे. तसेच बसथांब्याला छप्पर नसल्याने उन्हा-पावसात उभे राहणेदेखील मुश्कील बनत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बसथांब्याची जैसे थे परिस्थिती असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बसथांब्याची दयनीय अवस्था पाहून प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.