For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निलंबित वीज कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरु

07:02 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
निलंबित वीज कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरु
Advertisement

दोषी आढळल्यास होणार पुढील कारवाई

Advertisement

त.भा. प्रतिनिधी

पणजी : वीज खात्यातील निलंबित करण्यात आलेल्या अभियंते-कर्मचारी मिळून एकूण 13 जणांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली आहे. त्यातून दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर कारवाईमुळे वीज खात्यात खळबळ माजली असून कामाकडे दुर्लक्ष व निष्काळजीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा वीज खात्याच्या सर्व अधिकारी, कर्मचारीवर्गास देण्यात आला आहे. यापुढे वीज खात्याची कामे करताना कोणचाही बळी जाता कामा नये, असा कडक संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.

Advertisement

कार्यकारी अभियंता काशिनाथ शेटये यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात काही ठिकाणी वीज खात्याची कामे करताना अपघात घडले आणि यासाठी काही जणांना प्राण गमवावे लागले. त्यामागे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा होता, असे दिसून आले आहे. वीज कर्मचाऱ्यांना कामे करताना सुरक्षेची सर्व साधने देण्यात आली आहेत. त्यांचा ते वापरच करत नाहीत. साहाय्यक, कनिष्ठ अभियंता यांचे ते काम असून त्यांनी वीज कर्मचारी काम करताना त्यांच्यावर देखरेख ठेवणे आवश्यक आहे आणि ते काम होत नाही, असे दिसून आले आहे.

यापुढे त्यांनी वीज कर्मचारी सुरक्षेची सर्व साधने वापरून काम करतील याकडे लक्ष दिले पाहिजे. कर्मचारी वर्गानेदेखील सर्व साधने वापरूनच कामे करावीत, असे बजावण्यात आले आहे. यापूर्वी जे झाले ते झाले. त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. सर्वांनी जबाबदादरीने कामे करावीत, असा संदेश या निलंबनाच्या कारवाईतून देण्यात आला आहे. यापुढे दुर्लक्ष, निष्काळजीपणा करू नका, असे सूचविण्यात आले

आहे.

Advertisement
Tags :

.