महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वडोदरातील डेंटल म्युझियम गिनिज बुकमध्ये सामील

06:32 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2 हजारांहून अधिक टूथब्रशचा संग्रह

Advertisement

गुजरातच्या वडोदरा येथे आशियातील पहिले डेंटल म्युझियम असून त्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. डॉ. चंदराणा डेंटल म्युझियमने टूथब्रशचा सर्वात मोठा संग्रह आणि त्या टूथब्रशच्या प्रदर्शनाचा विक्रम केला आहे.

Advertisement

या संग्रहात 2 हजार 371 दात अन् 26 प्रकारचे टूथब्रश सामील आहेत. यात दातुन आणि 19 व्या शतकतील हाडं अन् प्राण्यांच्या केसांपासून निर्मित टूथब्रश सामील आहेत. टूथब्रशचा सर्वात मोठ्या संग्रहाचा विक्रम  यापूर्वी एका कॅनेडियन युवतीच्या नावावर होता, तिच्याकडे 1678 टूथब्रश होते.

2016 मध्ये डॉ. योगेश चंदराणा यांनी हे म्युझियम स्थापन केले होते. म्युझियममध्ये दातांची तपासणी लवकर होते. प्रथम दातांचा फोटो काढला जातो अणि 30-40 सेकंदात रुग्णाच्या मोबाइलवर दातांच्या समस्येचा अहवाल पोहोचतो असे डॉ. चंदराणा यांनी सांगितले.

मुलांसाठी विशेष व्यवस्था

डेंटल म्युझियममध्ये  अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषकरून मुलांना अॅनिमेशनद्वारे दातांच्या आजारांविषयी सांगण्यात येते. डेंटल रिपोर्ट मिळाल्यावर आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने डेंटल हेल्थ असेसमेंटची माहिती मोबाइलवर पाठविली जाते.

अमेरिकेतून सूचली कल्पना

या म्युझियमची संकल्पना अत्यंत नवी आहे. बडोदा येथे एका रुग्णालयात काही वर्षे काम केल्यावर अमेरिकेत गेलो असता तेथे हाउस ऑन रॉक्स नावाचे म्युझियम पाहिले. एका इसमाने स्वत:चे म्युझियम तयार केले होते, यात अनेक प्रकारच्या गोष्टी होत्या. जर एक इसम इतक्य सर्व गोष्टींचे म्युझियम तयार करू शकतो. तर मग डेंटिस्ट म्हणून डेंटल प्रॉडक्ट्सचे म्युजियम का तयार करू शकत नाही असा विचार मी केला. 2013 मध्ये याची कल्पना सुचली आणि 2016 पर्यंत भारत आणि आशियाती पहिले डेंटल म्युझियम तयार झाले. मला याकरता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी टूथब्रश संग्रह सुरू केला असे डॉ. योगेश सांगतात.

संग्रह वाढतोय

प्रारंभी म्युझियममध्ये 500 टूथब्रश होते, परंतु आता ही संख्या वाढू लागली आहे. म्युझियममध्ये प्रारंभी टूथब्रश, टूथपेस्ट, माउथवॉश, डेंटल केअरशी निगडित जुनी आरोग्य उपकरणे, जाहिराती, डेंटल चेअर्स यासारख्या 2-3 हजार गोष्टींचा संग्रह होता, हा संग्रह आता वाढविला जात असल्याचे डॉ. योगेश यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article